अजूनही ….
तुज्या अंतरीच्या भावनांचा
न जुळलेल्या मनाचा
शोध अजूनही चालू आहे .
दाटून आलेल्या कंठाचा
न बोललेल्या शब्दांचा
घोळ अजूनही चालू आहे .
चुकलेल्या पावलांचा
न गवसलेल्या वाटांचा
शोध अजूनही चालू आहे .
उडून गेलेल्या रंगांचा
जळलेल्या मोहराचा
काळ अजूनही चालू आहे.
----------------------तुषार क्षीरसागर
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें
Please Be Aware While Commenting...