मी

मी 

एका ध्येयपूर्तीसाठी अनंत वाटांच्या पायघड्या तुडवत चाललो मी
एका स्वप्नपूर्तीच्या प्रेमात सगळे काही विसरत चाललो मी
एका खोट्या आसक्तीच्या ओढीत ओढत चाललो मी
एका वाढत चाललेल्या गर्दीत लुप्त होत चाललो मी

एका अंधारातून उजेडाकडे जाताना सगळे प्रेमळ हात सोडत चाललो मी
एका समाधानाच्या शोधात असमाधानी होत चाललो मी
एका श्रीमंतीच्या वाटेवर मनाने गरीब होत चाललो मी
एका शब्दात जगाच्या बाजारात स्वार्थी होत चाललो मी 


------ तुषार क्षीरसागर

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

भला इंसान

बोल तेरा मै क्या बनू ?